मेहकर
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी मेहकर नगरपरिषदेत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधत महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन तसेच भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वीर हुतात्म्यांच्या त्याग व संघर्षाची भावपूर्ण आठवण करून देत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यासह नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटनेते विलास चनखोरे, नगरसेवक सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे तसेच नगरसेवक पती निसार यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांच्या सहभागामुळे सोहळ्याला अधिकच रंगत आली. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात पार पडत नागरिकांमध्ये उत्साह व अभिमानाची भावना निर्माण झाली.
Users Today : 21