बुलढाणा
शहरातील शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय हे केवळ एका आमदाराचे राजकीय कार्यालय नाही, तर सर्वसामान्य, गोरगरिब आणि संकटात सापडलेल्या जनतेसाठी आधाराचे केंद्र बनले आहे. आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून हे कार्यालय अक्षरशः जनसेवेसाठी समर्पित आहे. वर्षातील ३६५ दिवस, बाराही महिने, आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसातील २४ ही तास हे कार्यालय जनतेसाठी खुले असते. येथे कोणत्याही नागरिकाला येण्यासाठी कोणत्याही पीए, स्वीय सहायक किंवा अपॉइंटमेंटची गरज भासत नाही. थेट कार्यालयात यायचे, आमदार साहेबांसमोर आपली समस्या मांडायची आणि त्यावर तत्काळ मार्ग काढला जातो.
विशेष म्हणजे, आमदार संजुभाऊ गायकवाड स्वतः जनतेच्या भेटीसाठी कायम उपलब्ध असतात. आणि काही कारणास्तव ते बाहेरगावी किंवा अनुपस्थित असले, तरी त्यांच्या परिवारातील सदस्य किंवा सहकारी कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित राहून जनतेचे प्रश्न ऐकून घेण्याचे आणि ते मार्गी लावण्याचे काम सातत्याने करत असतात. त्यामुळे “मातोश्री” हे कार्यालय खऱ्या अर्थाने २४ तास जनतेच्या सेवेसाठी धावणारे कार्यालय म्हणून ओळखले जाते.
या कार्यालयात कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण मोठ्या पदावरचा किंवा कोण सामान्य कामगार — असा कोणताही भेदभाव केला जात नाही. जात, धर्म, पक्ष किंवा आर्थिक परिस्थिती न पाहता प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न शांतपणे ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणूनच येथे येणारा प्रत्येक माणूस समाधान, विश्वास आणि आपलेपणाची भावना घेऊन परत जातो.
महाराष्ट्रातील काही प्रसारमाध्यमे किंवा विरोधक आमदार संजुभाऊ गायकवाड यांची प्रतिमा कशीही रंगवण्याचा प्रयत्न करत असले, तरी “मातोश्री” कार्यालयात एकदा आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खरे संजुभाऊ कोण आहेत, हे जवळून अनुभवायला मिळते. संकटात धावून जाणारा, सामान्य माणसाच्या वेदना समजून घेणारा आणि जनतेसाठी कायम उपलब्ध असलेला नेता म्हणजे संजुभाऊ गायकवाड, अशी भावना आज हजारो नागरिकांच्या मनात आहे. 🚩
– एक बुलढाणेकर
#sanjaygaikwad #buldhana #shivsena
Users Today : 24