धक्कादायक!प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्या

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी (कोपरगाव )नात्याला काळीमा फासणारी घटना अहमदनगरच्या कोपरगावातून येत आहे. लहान बहिणीने मोठ्या बहिणीचे प्रेम संबंधांची घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना 30 सप्टेंबरला घडली आहे.16 वर्षीय हर्षदाचा ओडणीच्या सहाय्याने गळा आवळूतीची हत्या करून तीने गळफास घेतला हे दर्शवण्यासाठी तीने लहान बहिनीला लटकवल्याची माहिती मिळत आहे. मृत हर्षदाची 19 वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुर तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आणि ती प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मृत हर्षदा समजल्याने तीने घरी सांगितले. त्यामुळे सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हर्षदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी हि प्रियकरासोबत पळून गेली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपी बहीण सृष्टी आणि तिचा प्रियकर यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून अटक केले आहे. आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात सृष्टीचा प्रियकर तसेच अन्य कोणी सहभागी आहेत का याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *