प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : तालुक्यातील धवळीपाडा ते कोकणीपाडा रस्त्यावर अॅपेरिक्षाने रिक्षाला धडक दिल्याने सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली . याप्रकरणी अॅपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील धवळीपाडा ते कोकणीपाडा रस्त्यावर अॅपेरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा ( क्र.जी.जे. ५ एझेड ८१११ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात अॅपेरिक्षा चालवून वडझाकण शिवारात समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने अपघात घडला .घडलेल्या अपघातात राजू टेट्या प्रधान , वसंती अर्जुन पाडवी , शिवूबाई ईमा प्रधान , संगिताबाई दिलवर प्रधान , रमिला रोहिदास प्रधान सर्व रा.धवळीपाडा ता.नवापूर व गोविंद खाड्या वळवी रा.मोगराणी ता . नवापूर हे जखमी झाले .अपघाता नंतर ॲपेरिक्षा चालक घटना स्थळावरुन पसार झाला . याबाबत राजू टेट्या प्रधान यांच्या फिर्यादी वरुन उपनगर पोलिस ठाण्यात ॲपेरिक्षा चालकाविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ , १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव गावीत करीत आहेत .