प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार :- पालिकेचा पंधराव्या वित्त आयोगातून शहरातील सिटी पार्क मध्ये ५४ लाख २६ हजाराच्या नवीन पाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पंधरावा वित्त आयोगातून शहरातील सिटी पार्कमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याने या परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निकाली लागला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नंदुरबार शहरातील शिवाजी कॉलनी, लोकमान्य कॉलनीत विलास रघुवंशी यांच्या घरापासून शनी मंदिर पर्यत रस्ता काँक्रीट करणे,सी.टी पार्क परिसरातील नवीन पिण्याची पाईप लाईन टाकणे तसेच सभामंडपाचे भूमिपूजन माजी चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले.
याप्रसंगी जि.प उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक दीपक दिघे,जगन माळी,फारुख मेमन,माजी नगरसेवक विलास रघुवंशी,आनंद रघुवंशी, हीना रघुवंशी, राजेंद्र पाटील,किशोर पाटील,विलास पाटील,योगेश पाटील,राहुल भोये, राहुल वडनेरे,गणेश बडगुजर,डॉ.सुनील पाटील,डॉ.संगीता पाटील,प्रा.बी.ए पाटील,अशोक टेंभेकर,रमेश पाटील.डॉ.तुकाराम पाटील,सतिष रघुवंशी,अरविंद पटेल,तुषार पटेल उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचा सुटलासि
सिटी पार्क परिसरात तिरुपती नगर, मोडक नगर,संयम पार्क,जिनय पार्क परिसरात नवीन पिण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याने तेथील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्न सुटलेला आहे. पालिकेच्या पंधरावा वित्त आयोगातून ५४ लाख २६ हजर ८८५ रुपये योजनेसाठी खर्च होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.