प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील अस्तंबा अरणबारी घाटातील नकटयादेव पाड्या वरील दरीत बकऱ्या चरावयास गेलेल्या युवकावर दरड कोसळल्याने अस्तंबा येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली . धडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथील रायसा बिंद्या वळवी ( वय ४० ) व त्यांचा लहान भाऊ केशव बिंद्या वळवी ( २७ ) हे दोन्ही भाऊ दि . ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सुमारे ३ वाजेच्या दरम्यान अरणबारी घाटात बकऱ्या चरावयास गेले असता परिसरात जोरदार पाऊस पडत होता . त्यामुळे अचानकपणे दरड कोसळायलासुरु झाली . पाऊस व दरड पासून संरक्षण व्हावे याकरिता पळत असतांना दरडचे काही दगड केशव बिंद्या वळवी यांच्या डोक्यात , कपाळावर , व डोळ्याजवळ लागल्याने तो गंभीर जखमा झाला . अति रक्तस्राव झाल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला . काल खुप पाऊस होता व सदर परीसर हा अतिदुर्गम भागातील असल्याने आज पोलीसात फिर्याद देण्यात आली . रायसा बिंद्या वळवी यांच्या फिर्यादी वरुन धडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोना दीपक वारुळे करत आहेत . मयत केशव बिंद्या वळवी यांच्या पश्चात बायको , दोन मुले असा परिवार आहे .