प्रतिनिधी, अशोक भाकरे ; मा.जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खाली विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की अकोट हिवरखेड रोडवर उमरा गावाचे शेतशिवारात काही इसम 52 तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत आहेत.त्या गोपनीय खबरेवरून दोन पंचासमक्ष छापा मारला असता 4 आरोपी रंगेहाथ जुगार खेळतांना मिळून आले.त्यांच्या जवळून नगदी 5000 रुपये 52 तास पत्ते 4 मोबाईल किंमत 30000 रुपये असा एकून 35000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी मिळून आल्याने वरील आरोपी विरुद्ध पो.स्टे. अकोट ग्रामीण येथे जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपी (1)सचिन देवानंद गजभे रा.आडगाव खुर्द (2)सोनू शब्बीर शहा (3 )शेख नाजीम शेख साहिल सर्व रा.आडगाव खुर्द (4 )गजानन गोरखनाथ जगताप रा.अकोट या चौघांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा.जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या विशेष पथकाने आज दुपारी 4 वाजता केली,