औरंगाबाद विभागीय ज्युनियर १८ वर्षाखालील हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा शुक्रवारी

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी: गोकुळसिंग राजपूत

 

औरंगाबाद,महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्यावतीने जूनियर १८ वर्षाखालील मुले व मुली या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १७ ते २० ऑक्टोबर २०२२ रोजी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न होत आहेत. या स्पर्धेसाठी औरंगाबाद विभागीय ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धा दि. १४ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता इन ग्राउंड स्पोट्र्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा जन्म १/१/२००४ किंवा त्या नंतरचा असावा. जन्म पुराव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजी व मराठी मध्ये असलेल्या किंवा एस. एस. सी बोर्डाचे जन्मतारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या स्पर्धेकरिता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन औरंगाबाद व्हॉलिबॉल संघटनेचे विभागीय सचिव तथा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिरसाट, हिंगोली जिल्हा सचिव एम ए बारी, परभणी जिल्हा सचिव मोहम्मद चाऊस, सह आदींनी केले आहे अधिक माहितीसाठी डॉ. आबासाहेब शिरसाट ९४२१३१३१७७ प्रमोद महाजन ९०१११२०४०१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

 

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *