आयर्नमॅन 70.3 – ही एक क्रीडा मालिका आहे जी जर्मनीतील ड्यूसबर्ग शहर येथे वर्ल्ड ट्रायथलॉन ऑर्गनायझेशनने 28 ऑगस्ट 2022 ला आयोजित केलेल्या लांब-अंतराच्या ट्रायथलॉन शर्यतींपैकी एक आहे. आयर्नमॅन 70.3 मध्ये तीन क्रीडा प्रकारांचा समावेश आहे- 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमी धावणे, जे सलग साडेआठ तासांच्या अविरत कालावधीत पूर्ण करावे लागते. या स्पर्धेत जगभरातून एकूण 2600 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत चंद्रपूर पोलीस दलातील सहाय्यक फौजदार श्रीपाद बल्की यांनी 5 तास 52 मीनीटात पुर्ण केली आणि आयर्न मॅन हा बहुमान मीळवीला ही चंद्रपुर जिल्हा पोलीस दला करीता अत्यंत अभिमानाची घटना आहे व त्या करीता श्रीपाद बल्की यांचा पोलीस विभागातर्फे तसेच विविध संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला
Users Today : 37