क्रीडा व युवक सेवा मंत्रालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा मार्फत तसेच बुलढाणा जिल्हा खेळ संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या तांत्रिक तथा आर्थिक सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्काॅश क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ आदर्श विद्यालय चिखली येथे संपन्न.. दि.१९/१०/२०२२ वार बुधवारला वयोगट १४/१७/१९ वयोगटातील मुले/मुली या खेळात सहभागी झाले होते या स्पर्धेच्या उद्यघाटण प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. नानासाहेब साहेब बाहेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. प्रेमराज भाला, शिक्षण प्रसार मंडळाचे सहसचिव मी.श्री. कैलास शेटे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पुजन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन नारळ फोडुन मैदानाचे उद्यघाटण करण्यात आले व नंतर खेळाच्या स्पर्धाला सुरुवात झाली.या स्पर्धेसाठी उपस्थीतांमध्ये आदर्श विद्यालयाचे प्राचार्य श्री. समाधान शेळके ,उपप्राचार्य श्री.प्रमोद ठोंबरे,जिल्हा कॅश बॉल स्पर्धेचे जिल्हाध्यक्ष क्रीडाशिक्षक शर्मा सर,जिल्हा स्काॅश खेळाचे सचिव श्रीराम निळे सर ,पर्यवेक्षक श्री.रमेश जाधव सर पर्यवेक्षक श्री.गणेश नालिंदे सर, क्रीडा शिक्षक संतोष गुळवे सर,क्रीडा शिक्षक होमराज कोळी सर उपस्थीत होते उपस्थितीमध्ये आज आदर्श विद्यालयाच्या डोम मध्ये कॅश बॉल चे उद्घाटन झाले व तसेच बॅडमिंटन कोर्ट चे उद्घाटन झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी स्काॅश खेळासाठी शाळेला योग्य ते मैदान व साहित्य लवकरच उपलब्ध करुन देवु व विद्यार्थ्यांना नविन खेळात सहभाग घेता येईल यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करु व खेळाडु निर्माण कसे होतील यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देवु असे अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त केले खेळामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी संघ उपस्थीत होते. या दरम्यान शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थीत होते…
Users Today : 23