खाजगी प्रवासी बसेसची तपासणी मोहीमेंतर्गत 75 खाजगी बस धारकांकडून 2 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसुल

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी;प्रा. भरत चव्हाण -नंदुरबार: जिल्ह्यातील खाजगी प्रवासी बसेसची तपासणीसाठी विशेष मोहिम 9 ऑक्टोंबर पासून राबविण्यात येत असून या मोहिमेतंर्गत 275 बसेसची आतापर्यंत तपासणी करण्यात आली असून त्यात दोषी आढळलेल्या 143 बसेसवर कारवाई करण्यात आली असून 75 खाजगी बसधारकांकडून 2 लाख 72 हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यातील खाजगी प्रवासी बसेसची तपासणीसाठी 23 ऑक्टोंबर 2022 पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून तपासणी मोहीमेत विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करुन चालणाऱ्या बसेस, अवैधरित्या मालवाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल इत्यादी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व खाजगी बस धारकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन करुन प्रवाश्यांची सुरक्षितपणे वाहतूक करावी, असे आवाहन श्री.बिडकर यांनी केले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *