प्रतिनीधी रवि मगर पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर तीन दिवसीय सत्याग्रह, संचालक कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडे पदयात्रा परिणामांची जबाबदारी राज्य शासनाची – राज्य समन्वय समिती राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून पदभरती नसल्याने सहाय्यक प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत; तसेच नेट , सेट,पीएच.डी धारक उच्चशिक्षित तरूण बेरोजगारीत जीवन जगत आहेत. करिता , नेट,सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीच्या वतीने ऐन दिवाळीत तीन दिवशीय सत्याग्रहाचे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तसेच कुलूगुरु, प्र. कुलूगुरु, शिक्षण सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दिनांक 27, 28 व 29 ऑक्टोबर 2022 रोजी संचालक उच्च शिक्षण, पुणे कार्यालया समोर सत्याग्रह, तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. समितीच्या खालील प्रमुख मागण्या: 1) केंद्र व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करणे, 2)याच निर्देशानुसार सी.एच.बी CHBधोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करणे, 3)सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे.4) विनाअनुदानित महाविद्यालयात कायमस्वरूपी पूर्ण सहाय्यक प्राध्यापक नियुक्त करणे.अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे लक्ष वेधण्यासाठीच्या कृती कार्यक्रमांमध्ये तीन दिवसीय सत्याग्रह आंदोलन, उग्र स्वरूपात करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर 2022 रोजी ची अयशस्वी झालेली बैठक, आणि त्याला प मेळाव्याचे स्वरूप दिल्याने त्या बैठकीतून निर्णय झाला. शिवाय शोषण करणारे तासिका तत्त्वाला पर्यायी धोरणासाठी स्थापन केलेल्या समितीचा प्रस्तावित मागण्यावर शासनाने दिलेला निर्णय हा निर्णायकतर नाहीत तर तो अन्यायकारक , शंका निर्माण करणारा, परीक्षेच्या व निकालाच्या कामात तांत्रिक अडचण आणणारा व कायदा व नियमांचा आधार न घेता काढलेला आसल्याने समितीने अमान्य केला आहे. शासनाला त्याची जाणीव करून देण्यासाठी 27 ते 29 ऑक्टोबर 2022 या तीन दिवशी आंदोलनात उच्चशिक्षित तरुणांचे भाषणे,वेदना, निदर्शने, संघटनेचे अधिवेशन, उच्च शिक्षण धोरणाचा निषेध, निदर्शने, तसेच उच्चशिक्षितांची पदयात्रा, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट भावनास टाळे लावण्यात येणार असून त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीस राज्य शासन जबाबदार असेल, असा इशारा राज्य समन्वय समितीच्या वतीने सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक डॉ.परमेश्वर पौळ, प्रा.प्रमोद तांबे, प्रा.सुरेश देवडे पाटील, डॉ. विश्वास देशमुख, डॉ. कांचन जोशी , डॉ. अमोल मस्के प्रा.विकास गवई यांच्यासह सेट नेट पीएचडी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व प्रकुलगुरू, उच्च व तंत्र विभागाचे विभागीय सहसंचालक यांच्यासह नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रशासनाला मागण्या व आंदोलनाचे स्वरुप कळवले आहे. निवेदन देताना समितीचे राज्य समन्वयक डॉ.परमेश्वर पौळ, डॉ. जीवन चव्हाण, डॉ. के.के. कदम, डॉ.बाबू गिरी, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अटकोरे एम.टी.डॉ.वर्षा मोरे,प्रा.पांदेवाड अनुसया, प्रा.माधव पुयड, प्रा. देबडवार राजेश, डॉ.घोडगे बी.आर., प्रा.जी.जी.शिंदे, प्रा. बी.आर. नरवाडे, प्रा.एम.बी.इबीतवार, प्रा. निरंजन गिरी आधी प्राध्यापकाची उपस्थिती होती.राज्य सरकारने बेरोजगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये!राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात आज हजारो जागा रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षापासून भरती बंद आहे. सध्या ती अत्यंत धिम्या गतीने सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नेट सेट आणि पीएचडी धारक उच्च शिक्षित तरुण भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. तरी शासनाने तात्काळ भरती करावी, बेरोजगार तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.
Users Today : 22