सोयगाव तालुक्यात रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वाटप सुरू जास्तीच जास्त हरभरा बियाचा लाभ घ्यावा;कृषी अधिकारी यांचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी, गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील विविध गावातील शेतकरी यांचे मार्फत रब्बी हंगामास सुरुवात झाल्याने ज्वारी ,मका ,हरभरा इत्यादी पिकांची लागवड सुरु झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव यांचेमार्फत कृषी सेवा केंद्र सोयगाव येथे उपलब्ध असलेले प्रमाणित बियाणे उचल करण्यास सुरुवात झाली आहे. आज दिनांक २७/१०/२२ ऑक्टोंबर अखेर हरभरा या पिकाचे ६० क्विंटल प्रमाणित बियाणे उचल झाले असून तालुक्यातील सावळदबारा, देव्हारी, नादांतांडा, टिटवी, बनोटी, म्हशीकोठा, जामठी मोलखेडा, फर्दापूर इच्छुक शेतकरी यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोयगाव एस.जी. वाघ यांनी केले आहे . सदरील बियाणे घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत परवाना घेणे बंधनकारक असून लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे .तालुक्यात कृषी सेवा केंद्र सोयगाव येथे हरभरा या पिकाचे बियाणे उपलब्ध असून प्रती पिशवी (३० किलो )अनुदान वगळता १३५० रुपये किंमत आहे .अशी माहिती कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 7 5 1
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *