विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी
::: गांधीग्राम पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवेदन दिले त्यावरती तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी निमा अरोरा प्रत्यक्षात गांधीग्राम ला पुलावरती येऊन पाहणी केली आणि गोपाय खेड येथे जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आणि संबंधित अधिकारी आणि शेतकरी यांची एक सविस्तर बैठक लावून त्यामधून शेतकऱ्यांचे शेतीचे मोबदला सरकारी रूल नुसार देण्यात येतील आणि रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे कारण या रस्त्याने विद्यार्थी शाळकरी व्यापारी वर्ग आणि कर्मचारी यांना सुद्धा पर्याय मार्गाने परवडत नसून संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील आणि संबंधित विभागाला नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी उपस्थित उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपविभागीय अधिकारी अप्पर राज्य महामार्ग विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व परिसरातील मनोहर शेळके पुरुषोत्तम दातकर दिलीप लेलेकर रमेश वानखडे गोपाल भाऊ म्हैसने रवि पाटील अरबड विलास पाटील वसु राजुभाऊ मगळे सुभाष डगेकर शोभाताई शेळके सुनील बांगर गोपाळ खेड येथील सरपंच गांधीग्राम येथील सरपंच दहीहंडा येथील ठाणेदार सुरेंद्र राऊत आणि त्यांचे कर्मचारी शेतकरी नागरिक यावेळी उपस्थित होते.