पांडुरंगाचे दर्शनाला
आणले पुढारी नेते
आम्हीचं खुशीत हो
आनंदा आले भरते
त्यांना रांग ना पाळी
दर्शन डायरेक्ट होते
खरोखर भगवंताशी
असेलजवळचे नाते
नेत्या सहीत सेल्फी
किती झुंबड उडते
देवही धन्य जाहले
नेत्याचे दर्शन घडते
नैवेद्य पुजेचा खर्च
गरीब जनता करते
एवढे तरी चांगले रे
हात जोडतात नेते
खुर्ची टिकूदे कायम
मनात इच्छा असते
प्रसिद्धीची खुमखुमी
जागो जागी दिसते
नेत्याने केला नवस
बातमी लगे पसरते
काहीचं केले नाही
जनता सर्व विसरते
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
सर नमस्कार
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती कृपया पीडीएफ अवश्य पाठवा ही विनंती