जाणकार नेतेसुध्दा
का बोलती विचित्र
पक्षात प्रत्येक असे
महाभाग महापात्र
आरोप प्रत्यारोपांचे
सुरू होते नवे सत्र
आंदोलने मारामारी
बदलून जाते चित्र
तीचं ती चर्चा चाले
विषय हा दिवसरात्र
वाढू लागतात शत्रू
दुरावतात जुने मित्र
मलीन होतात तेव्हा
नाती सगळी पवित्र
कमवलेले नाव भ्रष्ट
डागाळू जाई चरित्र
अति होता उद्रेक तो
हळूचं येई माफीपत्र
दुसरा वाचाळ वीर
बरळे काही विचीत्र
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.