ह हजेरी ..
पोलिसस्टेशन मध्ये
रोज लावतो हजेरी
आदेश हा कोर्टाचा
झाली पार बेजारी
हेलपाटे मार मारुन
पडून गेलो आजारी
बंगला घेतला नवा
ठाण्याचेचं शेजारी
सहन करतो फुका
पोलिसांची मुजोरी
परवा पर्यंत यांनीचं
बा केली जी हुजूरी
रे मिडिया वाल्याची
आगळीचं शिरजोरी
बातमी ओव्हनफ्रेश
काठ पदर भरजरी
माळरानावर लावले
झाड चांगले खजुरी
उद्या होणार मालक
आत्ता करतो मजुरी
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 22