थोडक्यात जाणून घेऊया बिरसा मुंडा कोण?
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला.
ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारांवर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजाविरुद्ध मोठा लढा उभारला होता.
सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळात उपासमारी व महागाईने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची नि:स्वार्थ अंतकरणाने सेवा केली़ ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले होते.
त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तीर-कमठा, भाले यांच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढविले होते. सन १९०० मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पहाडावर आदिवासी जनतेला मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला.
तद्नंतर रांची कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे अनन्वित छळ झाल्याने त्यांचे ९ जून १९०० मध्ये निधन झाले.
Users Today : 14