आलेगाव वन विभागाऐवजी चान्नी पोलीस स्टेशनची कारवाई
योगेश नागोलकार राहेर
पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत चतारी परिसरातील वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्षतोडीला उधान आले होते, याबाबतची तक्रार वृक्षप्रेमिकडून होत होत्या,त्यामुळे आलेगाव वन विभागाऐवजी अखेर चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, यांनी आपल्या ताफ्यासह चतारी सांगोळा रस्त्याला लागून वृक्षांची कत्तल करताना बुधवारी पाच जणांना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले होते. संबंधितांच्या फिर्यादीवरून कटाई करण्यासाठी झाडांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यासह सहा आरोपीविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, त्यापैकी ३ जणांची समजपत्रावर सुटका करण्यात आली होती, दोन जणांना गुरुवारी पातूरच्या न्यायालयात हजर केले असता, दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून, झाडांची विक्री करणारा शेतकरी अद्यापही फरार आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.
बॉक्स दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त दहा टन लाकूड ४० हजार,कटर मशीन दहा हजार,तीन मोटार सायकल एक लाख ८० हजार,तीन मोबाईल ३० हजार,असा एकूण २ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बॉक्स या.. सहा आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल शेख निसार शेख आलम ४५, शेख अफरोज शेख सिराज २६, सय्यद शब्बीर सय्यद नजीर ६१, शेख मुस्ताक शेख आलम ५०, जावेद खान तमिज खान २५, सर्व रा.पातुर सुपाजी सुखदेव बदरखे रा. चतारी असे सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया वृक्षतोड करताना पाचआरोपीना रंगेहाथ पकडले त्यापैकी दोन आरोपी अटक केले तिन आरोपी समजपत्रावर सुटका करण्यात आली. एक आरोपी फरार झाला एकूण आरोपी सहा अटक दोन जणांना गुरुवारी पातूरच्या न्यायालयात हजर केले असता, दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
योगेश वाघमारे ठाणेदार पोलीस स्टेशन चान्नी