बुलडाणा, दि. 7 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्हा न्यायालय येथील धावपटू गजानन पाटील आणि सुरेश शिंबरे यांनी चिखली ते बुलढाणा मॅरेथॉन धावण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
मॅरेथॉन कार्यक्रमास चिखली येथील दिवाणी न्यायाधीश यांनी हिरवी झेंडी दाखवली. या मॅरेथॉनचा जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात समारोप झाला. सदर मॅरेथॉन 22 किमी मध्ये ठिकठिकाणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांनी दोन्ही धावपटूंचे स्वागत केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा न्यायाधीश श्री. मेहरे यांनी धावपटूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. भारंबे, एल. डी. सपकाळ, दिनकर पाटील यांनी सहकार्य