अल्पसंख्याक बहुल वस्त्यांची नामकरण महसूली व मतदार यादीत नोंद व्हावी करिता रफ़ीक शेख यांची ग्रामविकास अधिकारी यांच्या कड़े मागणी.

Khozmaster
2 Min Read

उदयनगर:-येथील ग्रामपंचायत हद्दितील अल्पसंख्याक बहुल वसत्या असून त्या वस्त्यांचे नामकरना बाबत ग्रामपंचायत ठराव पारित करून वरिष्ठ कार्यालयात महसूल व मतदार यादीत नोंद व्हावी करिता प्रस्ताव पाठविन्यात यावा करिता राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रफ़ीक शेख यांनी उदयनगर ग्रा.प.ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना दि.8 सप्टेंबर रोजी निवेदना द्वारे मागणी केली.

दिलेल्या निवेदनात नमूद असे की उदयनगर (उन्द्री)गावातील वार्ड क्रमांक 2 मधील मुस्लिम बहुल वस्ती असून त्या वस्तीचे नाव इस्लामपुरा म्हणून परिचित असून आज पर्यन्त महसूल व ग्रामपंचायत तसेच मतदान यादीत खड़कपुरा म्हणूनच नोंद आहे तरी ग्रामपंचायत ठराव पारित करून सदर वस्तीचे इस्लामपुरा म्हणून रेकॉर्ड ला नोंद घेण्यात यावी करिता वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठविन्यात यावा तसेच वार्ड क्र. 5 मधील लाखनवाड़ा रोड ला लागून असलेल्या वस्तीचे मागील ग्रामसभा ठराव नुसार ख्वाजा सलामत नगर नोंद घेण्यात यावी व रमेश दांदडे यांच्या शेतात झालेल्या नवीन वस्तिला सैलानी नगर म्हणून नामकरण करण्यात यावे व वरील तिन्ही नामकरणाच्या बाबतीत ठराव घेऊन महसूल व मतदार यादीत नोंद व्हावी करिता प्रस्ताव पाठविन्यात यावे करिता निवेदन सादर असे निवेदन उदयनगर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी दीपक गिरहे व सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांना दिले आहे या वेळी रफ़ीक शेख ग्रामपंचायत सदस्य उदयनगर,रमेश पाटिल (ग्रा.प.सदस्य)अशोक हतागले,गणेश काळे ग्रा.प.सदस्य, सौ सुनीता प्रशांत झिने ग्रा.प.सदस्या,शेख नसिर शेख ख्वाजा,प्रशांत झिने ,सेनेचे जितेंद्र पुरोहित,आकाश राउत,सलीम खा,शेख समीर,शेख निसार,शेख शकील आदी उपस्थित होते.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *