पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीची टांगती तलवार, पाणीपुरवठा बंद करण्याबाबत काय आहेत सूचना
पुणे : पुणे जिल्ह्यातील शेतासाठी दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे नियोजित असून धरणातील पाणीसाठा पाहता पुणे शहरात पाणीकपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जलसंपदा…
बाईक रेस केल्याचा मोठा आवाज, भाडेकरुची झोपमोड, घरमालकाच्या हत्येने पुण्यात खळबळ
हडपसर : घरमालकाने दुचाकीच्या रेसचा मोठा आवाज केल्याचा त्रास झाल्याने भाडेकरूने त्याला बेदम मारहाण केली; तसेच पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते दीडच्या सुमारास उरळी…
Maratha Reservation: पुण्यात ‘कुणबी’च्या सव्वा लाख नोंदी; जिल्ह्यात २३ लाख कागदपत्रांची तपासणी पूर्ण
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आता सरकारी कार्यालयांमधून गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू…
पुण्यात रेल्वेचा २ दिवस ट्रॅफिक ब्लॉक,मुंबई पुणे सेवेवर परिणाम,’या’ गाड्या रद्द, काही उशिरानं सुटणार,यादी समोर
पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे - लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.…
संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा
पुणे : मुळशी तालुक्यातून मन हेलावणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक सापडले आहे. एवढेच नाही तर त्या अर्भकाच्या…
पुणे स्टेशनवर प्रवाशांना चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार,‘रेस्टॉरंट ऑन व्हील’चे उद्घाटन, ऑनलाइन बुकींगची सोय
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पुणे विभागात सुरू झालेले हे दुसरे…
राज्यात ‘बिहार पॅटर्न’! मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी घटकांचे होणार सर्वेक्षण, माहितीचा फायदा काय?
पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना आता मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचे बिहारच्या धर्तीवर मागासवर्गीय आयोगाकडून घरोघरी सर्वेक्षण…
लोखंडी सळई डोक्यावर पडून ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; पुण्यातील घटना
पुणे : गृह प्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे…
Vande Bharat Express: वंदे भारतचा पुण्यात ‘लेट मार्क’; गेल्या ९० दिवसांत ४० वेळा रेल्वेला उशीर
पुणे : देशाची सर्वांत वेगवान, वेळापत्रकात काटेकोर मानल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला गेल्या काही काळात पुण्यात पोहोचण्यासाठी वारंवार विलंब होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईहून पुणे व सोलापूरहून पुण्यात…
पाचवीची मुलगी एकटीच पुण्याहून ठाण्याला पोहोचली, घरुन पळून जाण्याचं कारण साऱ्या पालकांना चिंतेत टाकणारं
पुणे: अभ्यासाचे ओझे; तसेच शाळा, शिकवणी आणि वेगवेगळ्या क्लासचे बरडन आणि पालकांच्या अपेक्षा या साऱ्या तणावातून पाचवीतील विद्यार्थिनीने दीक्षा घेण्याचे ठरवले. मुंबईला जाण्यासाठी एका रिक्षाचालकामार्फत तिने कॅब बोलावली. मुलगी घरी न…
