जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्यासाठी शिवसेना-भाजप च्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.डॉ. संजयजी कुटे साहेब यांनी पदाधिकारी यांची संवाद साधून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सोबत बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर,आमदार सौ.श्वेताताई महाले,आमदार संजयजी रायमुलकर, माजी आमदार चैनसुख संचेती,डॉ.शंशिकात खेडेकर,तोतारामजी कायंदे विजयराव शिंदे,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,बळीराम मापारी,ओमसिंग राजपूत व शिवसेना उपजिल्हाप्रमुख व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 26