- प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील रायंगण गावा जवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली . या प्रकरणी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील सुनिल गावित हे दुचाकीने ( क्र.जी.जे .१ ९ के १८४७ ) धुळे – सुरत महामार्गाने जात होते . यावेळी हितेश रघुनाथ पगारे ( रा.खंडलाय खुर्दे ता.धुळे ) याने त्याच्या ताब्यातील वाहन ( क्र.एम.एच .१२४८४७ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून रायंगण गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात सुनिल गावित यांना गंभीर दुखापत झाली . या बाबत आकाशा सुनिल गावित यांच्या फिर्यादी वरुन नवापूर पोलिस ठाण्यात हितेश पगारे याच्याविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३८ , ३३८ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . नरेंद्र नाईक करीत आहेत .