पोलीस ठाणे कपीलनगर येथे मिसींग मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न
नागपूर : दिनांक १३.०९.२०२४ रोजी , “गणेशोत्सवाचे” औचित्य साधुन पोलीस ठाणे कपील नगर चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने व बुद्धी कौशल्याने शोध घेवुन व ते हस्तगत करून पोलीस ठाणे कपीलनगर येथे अर्जदारांचे हरविलेले मोबाईल पैकी माहे ऑगस्ट २०२४ मध्ये हस्तगत केलेले वेगवेगळे कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमती अंदाजे २,४२,१४२/- रू. चे त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी समाधान दर्शवुन पोलीसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सन २०२४ मधील मिसींग मोबाईल पैकी एकुण ७६ मोबाईल मुळ मोबाईल धारक अर्जदार यांना परत करण्यात आले आहेत. तसेच, यापुर्वी सुद्धा कपीलनगर पोलीसांनी अथक परिश्रम घेवुन सन २०२२ व सन २०२३ चे एकुण २०० मोबाईल हे मुळ मोबाईल धारक अर्जदरांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क्र ०५), नागपूर शहर, मा. श्री संतोष खांडेकर सहा पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. महेश आंधळे, मपोहवा. गौरी हेडाऊ, सायबर मदतनीस पोअं. आशिष व सचिन टांगले यांनी केली.