प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -:अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथे बहिणीला मारहाण का केली असा जाब विचारल्याच्या रागातून घरात घुसून कुटूंबाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथील निर्मला राजा प्रसाद यांची लहान बहिण सुनंदा हिला का मारले असा जाब विचारला . याचा राग आल्याने प्रमोद बारकू वळवी , बारकू ईरमा वळवी , बाजूबाई बारकू वळवी व बालीबाई बारकू वळवी यांनी निर्मला प्रसाद यांचे वडीलांचे घरात प्रवेश केला . तसेच प्रमोद वळवी याने निर्मला प्रसाद यांचा हात पिळून हाताबुक्यांनी मारहाण केली व घरातील अशोक दिनकर वळवी , सारपबीई सांद्या वळवी , दिनकर ईरमा वळवी यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली . या मारहाणीत निर्मला प्रसाद यांचे मंगळसुत्र तुटून नुकसान झाले . तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली .या बाबत निर्मला प्रसाद यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ४५२ , ४२७ , ३२३५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील पोना . स्वप्रिल गोसावी करीत आहेत .