तलवार बाळगल्या प्रकरणी : एका विरुद्ध गुन्हा दाखल..

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वडखुंट येथील चौफुली जवळ विठ्ठलसिंग फुलसिंग वसावे रा.कुंभ्याफळी चिंचपाडा ता.नवापूर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत १०० रुपये किंमतीचे एक तलवार विना परवाना कब्जात बाळगतांना आढळून आला .या बाबत पोना . जितेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादी वरुन विठ्ठलसिंग वसावे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा १ ९ ५ ९ चे कल्मा ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत .

0 9 4 5 8 1
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *