प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील केली येथे जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील केली येथील सकाबाई रेहम्या वसावे या जादूटोणा करुन माणसे व गुरांना मारुन टाकते . या संशयावरुन सकाबाई वसावे यांना काल्ला नाना वसावे व कोमल्या काल्ला वसावे यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली .
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली .
या बाबत सकाबाई वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात महाराष्ट्र नरबळी व अमानुष अघोरी विद्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ ( २ ) , भादंवि कलम ३२३ , ५०४ , ५०४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे करीत आहेत .