संतोष राठोड यानां नुकसान भरपाई देण्याची;मा सभापती धरमसिंग चव्हाण यांची मागणी सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नादातांडा येथे गेल्या काही दिवशात देशात गुरांमधे लम्पी व्हायरसच्या संसार्गासारखी लक्षणे आढळून येत आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात नादातांडा येथे दि.१०/९/२२ रोजी अल्पभूधारक शेतकरी संतोष मोहन राठोड यांच्या बैला झाली होती लम्पी स्क्रीन रोगाची लागण झाल्याने बैल दगवला. मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी दि.८/९/२२ रोजी बातमी प्रकाशित केली होती. की लम्पी स्क्रीन रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना झाला आहे आपल्या परिसरात लागण सुरुवात पण झाली आहे. अशी बातमी दै.सां.खोज मास्तर न्यूज मधे प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेऊन लसीकरण कँम्प नादातांडा येथे होणार आहे.परंतु ज्या ज्या जनावरांमधे लम्पी स्क्रीन सदृशय रोगाचे लक्षण दिसत असल्यास त्या जनावरांना इतर जनावरांशी संपर्क येवू न देता योग्य काळजी घेऊन जनावरांचे लसीकरण करून घ्यावे अशे आवाहन मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले होते. पण संबंधित पशु विभागाने व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण या बातमीची दखल घेतली आणि लवकरच एक ते दोन दिवसात नादातांडा जनावरांच्या लसीकरण कँम्प घेतला जाईल अशी बैठक. सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. आणि फ्रि मधे लसीकरण होईल अशी ग्वाही दिली.सावळदबारा परिसरात जनावरांना लसीकरण होणार आहे.शेतकरी संतोष राठोड यांनी गुरांचा बाजारातून ऐंशी हजाराची बैलाची जोडी ऊसतोडी कामासाठी विकत घेतली होती. त्यापैकी एक बैला लम्पी स्क्रीन रोगाचा व्हायरस झाल्याने वेळेवर उपचार व लसीकरण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नसल्याने मोहन राठोड याचां बैल दगावला आहे. परिसरात लम्पी स्क्रीन रोगाची जोरात साथ चालू आहे आणि पशुविभागाने नादातांडा येथे येऊन चौकशी केली असता त्यांना तीन ते चार जनावरे लम्पी स्क्रीन रोग आढळून येताना दिसला आहे.ऊसतोडीच्या कामगार संतोष राठोड यानां पशूविभागाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केली आहे.
Users Today : 26