प्रतिनिधी विशाल गवई अकोट गेल्या सात ते आठ वर्षापासून थंड बसतात पडलेल्या मुंडगाव ते वणी वारूळा या महामार्गाचे काम ठप्प पडले आहे. प्रचंड ओरड होऊनही या कामाला अजिबात गती आली नाही.यासाठी सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते तसा युवा तरुण यांनी आंदोलने उभारून तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठी जागृती केली मात्र निरडावलेल्या शासनाला जनतेच्या गैरसोयीचे तथा जीव घेण्या संघर्षाचे काहीच घेणेदेणे नाही असा प्रकार या रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून दृष्टीपथास येतो.मुंडगाव ते वणी वारुळा ते तेल्हारा या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे कुठे रपट्यांचे खोदकाम करून ठेवले तर कुठे मोठमोठी दगड आथरुण ठेवली या दगडांवरून अनेक दुचाकी वाहनधारकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागलत आहे आता तरी शासनाने मुंडगाव ते वनी वारूळा व मुंडगाव ते तेल्हारा रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
Users Today : 26