विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी::: :टाकळी बु ते पिलकवाडी पादन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे शासनाने शेतकय्रांसाठी पालकमंञी पांदण रस्ता ही योजना कार्यान्वित केली आहे माञ अधिकाय्रांच्या निरूत्साहपणामुळे ही खंबीरपणे राबविल्या जात नसल्याचे दिसुन येत आहे टाकळी बु ते पिलकवाडी पांदण रस्त्याची दयनीय अवस्था तसेच सोबतच बाजुने वाढलेल्या काटेरी झुडपामुळे शेतकय्रांना आपल्या शेतापर्यत जाणे सुध्दा कठीण झाले आहे या रस्त्याअभावी अनेक शेतकय्रांनी संकटाचा सामना करावा लागत आहे प्रत्येक गावातील २ गांवाना जोडल्या जाणारे शिवदांडाचे तसेच प्रत्येक शेतकय्रांच्या शेतापर्यत जाण्यासाठी असलेले अनेक पांदण रस्ते आहे त्यापैकी अनेक गावातील रस्ते हे पाण्यामुळे खोल होऊन या रस्त्यावर मोठमोठी गटार निर्माण झाली आहे या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे शेतकय्रांना आपल्या शेतापर्यत बैलगाड़ी घेऊन जाणे सुध्दा कठीण झाले आहे या भागातील अनेक रस्त्यावर काटेरी झुडपे मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे रस्ता दुरुस्ती नसल्यामुळे दरवर्षी शेतकय्रांना शेतामधुन माल आणण्यासाठी ञास सहन करावा लागत आहे माञ याकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत आहे पालकमंञी पांदण रस्त्याच्या योजनेचा बट्याबोळ झाल असुन या योजनेचा शेतकय्रांना फायदा मिळत नाही या समस्येकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे याकडे संबंधीत विभागाने लक्ष देऊन पांदण रस्ते दुरुस्ती करावे अशी मागणी होत आहे.टाकळी बु ते पिलकवाडी शेत रस्त्यावर झाडें झुळपे वाढली असून या रस्त्याने पायी चालताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे :::
अनंता वसु शेतकरी टाकळी बु
Users Today : 54