सोयगाव नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत

Khozmaster
2 Min Read

सोयगाव तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ शेतकऱ्यांना आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव कृषि विभाग महाराष्ट्र शासन जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्हयातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकन्यांना सक्षम करणे, शेतकन्यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील गावांमध्ये सन २०१८-१९ पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची सन २०२२-२३ मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत राहील.अशे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी केले आहे.नंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सप्टेंबरअखेर पर्यंत एकूण प्राप्त अर्जावर निकषानुसार पूर्वसंमत मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व सदर विषयी संबंधीत शेतक-याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे. प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या http://dbt.mahapocra gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा आठ-अ, मोबाईल क्रमांक अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकान्यांचे प्रमाणपत्र अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ कृषि यांनी केले आहे.यावेळी कृषी सहाय्यक मानसिंग भोळे, कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख,कृषी पर्यवेक्षक अमोल महाजन, कृषी सहाय्यक विजयसिंग राजपूत, कृषी सहायक परिक्षेत पाटील,कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर, कृषी सहाय्यक सचीन पाटील, मयूर पाटील व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती कृषी सहाय्यक मानसिंग राजपूत यांनी खोज माष्टर न्यूज तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *