दि.१२/०९ / २०२२ चिखली शहरातील पंतप्रधान घरकुल अवास योजनेच्या अंतीम टप्प्यातील ९० हजार रुपयाचा निधी २ ते ४ वर्ष होत आहेत मिळालेला नाही .आय एच एस डी पी घरकुल योजनेचे ७ वर्ष होऊन गेल्या नंतरही अनेक लाभार्थ्यांचे निधी मिळालेले नाही . नगर परिषद हद्दीतील नझुलच्या जागेत राहणाऱ्या रहिवाशांकडून नगर परिषद बिल्कॉन कंन्सल्टन्सी यांनी १०० रुपये अनेक गरजुवंताकडून घेऊन पावती दिली तसेच . रमाई आवास योजना शहरी मागणी सर्वेक्षण सर्व साधारण पावती ५० रुपयाची देण्यात आली आज रोज पर्यंत काय कार्यवाही केली लेखी खुलासा सादर करावा तसेच अनुसुचीत जातीव नव बौध्द घटकातील वंचीत शोषीत वर्गाचा तत्काळ सर्वे करून रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी . तसेच बिल्कॉन कंन्सलटन्सी अपूर्ण काम सोडून निघून गेले त्यावर आपण काय कार्यवाही केली व आदेश दिला लेखी खुलासा सादर करावा . वरिल विषयासरून कार्यवाही न झाल्यास १५ दिवसा नंतर लोकशाही मार्गाने लढा उभारावा लागेल व न्यायालयीन लढा उभारून हायकोर्ट नागपुर येथे जनहीत याचीका दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रशांत भटकर यांनी दिलेला आहे . सविस्तर- १ ) सन २०१६ते १७ या कालावधीत चिखली शहरातील पंतप्रधान घरकुल अवास योजनेचा लाभ मिळावा करिता मोठ्या प्रमाणावर गरजुवंतांनी कागदपत्रांची पूर्तता करून २०१८ पासुन आज पर्यंत १२०० लाभार्थ्यांनी आपले घरकुल बांधले तत्काळ घरकुल न बांधल्यास४० हजाराचा निधी नगर परिषद कार्यालयात जमा करा अथवा घर पाडा व तत्काळ घरकुल बांधण्यासाठी सुरवात करा नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे बरेच लाभार्थ्यांनी एवढया कमी रकमेमध्ये जवळ पैसा नसल्यामुळे घरकुल बांधणे अशक्य असल्यामुळे निधी)पैसा जमा केले तर काहीनी घरकुल बांधायला सुरवात केली कोणी बॅकेचे कर्ज तर कोणी व्याजाने काहींनी उसनरी घरकुल बांधायला सुरुवात केली परंतु आज ३ते ४ वर्ष होत आहेत परंतु शेवटचा ९०००० हजाराचा हप्ता आज पर्यंत मिळालेला नाहीनगर जणघेतलेली अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांचे ३ते४ वर्ष झाले ९००० ० (नव्वद )हजार रुपये शेवटचा हप्ता मिळालेला नाही तत्काळ देणे बाबत नगर परिषद प्रशासनाने त्यावर काय कार्यवाही केली लेखी खुलासा सादर करावा तसेच चिखली शहरासाठी घरकुल टार्गेट २५०० च्या जवळपास आहे १४५० घरकुल लाभार्थ्यांच्या यादया मंजुर झालेल्या आहेत उर्वरीत ९५० गरजुवंतांचे घरकुलासाठी कार्यवाही कधी सुरु करणार लेखी खुलासा सादर करावा .२) आय . एच डी पी एकात्मीका गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत चिखली शहरात जवळपास ३२४२ घरकुल मंजुर झालेले आहे . गोरक्षणवाडी २८ २५ रोहीदास नगर २७७ माळीपुरा रोहीदास नगर ४३० अशा प्रकारे मंजुरात देण्यात आलेली होती . या वेळी सुद्धा बरेच लाभार्थी यांना घरकुल न बांधल्यास नोटीस देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल करिता तत्काळ घरकुल बांधायला सुरवात करा . लाभार्थ्यांनी घर पाडून घरकुल बांधायला सुरुवात केली . कोणाचा दुसरा कोणाचा तिसरा शेवटचा हप्ता आज ७ ते ८ वर्ष होत आहेत काही लाभार्थ्यांचे हप्ते आज रोज पर्यंत मिळालेले नाही कारणांसह लेखी खुलासा सादर करावा व तत्काळ कार्यवाही करावी . ३) नगर परिषद चिखली बिल्कॉन कंन्सल्टन्सी अनियमीत मालमत्ता नियमित करणे शासन निर्णय क्र. एम यु . एन . २०१८ /प्र.क्र. १९७ नवी दि १७ . ११ . २०२० सर्वे साधारण पावती दि २० . १० . २०२० या कालावधीत बरेच गरजु वंतांना देण्यात आल्या न .प . हद्दीतील नझुलच्या जागेत राहणार्या रहीवाशांकडून अनियमित मालमत्ता नियमीत करण्यासाठी १०० रुपयाची पावती दिली त्यावर आपल्या कार्याल्याने काय कार्यवाही केली लेखी खुलासा सादर करावा तसेच तत्काळ अनियमीत मालमत्ता नियमीत करणे बाबत कार्यवाही करावी .४) नगर परिषद चिखली बिल्कॉन कंन्सल्टन्सी रमाई आवास योजना (शहरी ) मागणी सर्वेक्षण व झोपडपट्टी (कुटुंब निहाय) सर्वेक्षण सर्व साधारण पावती जनते कडून ५० (पंन्नास रुपये) वसुल करण्यात आले आज रोज पर्यंत काय कार्यवाही केली लेखी खुलासा सादर करावा . रमाई घरकुल योजने अंतर्गत ज्यांना घरकुल घ्यायचे आहे .ज्या गरजुवंतानी पावती घेतली त्यांचे घरकुलाचे काम कोणत्या टप्यामध्ये पोहचले व किती दिवसात सुरु होईल लेखी खुलासा सादर करावा व तत्काळ कार्यवाही करावी .५) बिल्कॉन कंन्सल्टन्सी नगर परिषद चिखली यांचे आदेशानुसार अनियमीत मालमत्ता नियमीत करणे तसेच रमाई आवास योजना ( शहरी) मागणी सर्वेक्षण व झोपडपट्टी (कुटुंब निहाय) सर्वेक्षणाची पाहणी करून चिखली शहरातील रहीवाशांकडून मोठ्या प्रमाणावर १०० रुपये रमाई आवास योजना सर्वेक्षण ५० रुपये जमा केलेल्या पैशाचे काय झाले तसेच त्यांनी अर्धवट अपूर्ण काम सोडून निघून गेले त्यावर आपण काय कार्यवाही केली व काय आदेश दिला लेखी खुलासा सादर करावा व तत्काळ रमाई घरकुल आवास योजनेच्या कामास सुरवात करावी नम्र विनंती .१५ दिवसाच्या आत वरिल विषया सरून कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने लढा उभारावा लागेल तसेच न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा उभारावा लागेल हायकोर्ट नागपूर येथे जनहीत याचिका दाखल करण्यात येईल याची नोद घेण्यात यावी लेखी निवेदन प्रशांत भटकर (सामाजिक कार्यकर्ता) यांच्या सह निवेदनावर स्वाक्षरी आहे , राम गणेश अवसरमोल ,सिद्दु साळवे,तात्याराव इंगळे , राजु बळी , विष्णु चव्हाण .श्रीमती जिजाबाई जाधव . श्रीमती अनपूर्णाबाई जाधव, नर्मदा मोरे, कांताबाई जाधव ‘ गुंफा साबळे, सौ .विमल मोकळे , श्रीमती कविता खंडारे , सौ .रंजना पवार , सौ . पुष्पा घाडगे, श्रीमती सुभद्राबाई गवई, सौ . लक्ष्मी अवसरमोल , श्रीमती . प्रमिलाबाई खंडारे, कुलदीप जाधव, रामदास दिल वाले ,सौ .मंदाबाई जाधव, श्रीमती कांताबाई मगर, श्रीमती बेबी अवसरमोल , . सुशिला सिरसाठ, सखु डोंगरदिवे, सौ . आशा भुसारी , सौ .उज्वला जाधव, सौ . नंदा बोके, सौ . सुनिता आंभोरे, श्रीमती आशा साळवे, सौ .मिराबाई साळवे, सौ .माया जाधव , सौ . अनिता मगर, सौ विद्या जाधव,सौ रेखा बोके, सौ मंगला कांबळे, श्रीमती .पार्वताबाई खरात , श्रीमती सिंधु जाधव, सौ .शेशीकला गवई, श्रीमती नर्मदाबाई पवार, रेणुका जुमडे, शोभा खरात, सिंधु खाजेकर , आशा लव्हाळे ,सौ .उषा खरात, मंगला कानडे , अल्का विर , वच्छलाबाई जाधव,लीला वसंता खरात, दुर्गा दातार ‘, ज्योती जावळे, आशा गायकवाड, मंदा काफळे, गुंफाबाई सिरसाठ, बेबीबाई घेवंदे, कारीमाबी युसुब खॉ, कल्पना खरात ‘ सौ .पुष्पा शेवाळे, दशमाबाई पठठे, उमाबाई खुमारे, कपिल यंडोले , बानो शहा , शोभा मोरे, राधा यंगड , श्रीमती वच्छलाबाई साळवे,कौशल्याबाई यंडोले यांच्या स्वाक्षरी आहेत.
Users Today : 54