सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील आदीवासी व मातंग समाजाच्या भांडणाला राजकीय व सामाजिक वळण‌ देऊ नये;पोलीसानी तात्काळ गुन्हेगारावर योग्य कारवाई केली

Khozmaster
4 Min Read

सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथे मातंग समाजाचे एक इसम पंढरी म्हस्के यांचा मुलगा याचे व त्याच गावातील भिल्ल समाजाच्या लोकांसोबत काही किरकोळ कारणावरुन थोडा वादी वाद झाला होता त्यावेळेस पंढरी म्हस्के यांच्या मुलाला शिवीगाळ केल्याचे म्हस्के यांचे म्हणणे आहे त्यांनी फर्दापुर पोलीस स्टेशनला सदरील घडलेल्या प्रकरणाबाबत तक्रार सुद्धा केली होती त्याच तक्रारीची दखल घेऊन फर्दापुर पोलीस स्टेशनचे दबंग कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटना स्थळावर भेट देऊन खरी वस्तुस्थिती पडताळणी केली त्यावेळेस पंढरी म्हस्के यांच्या तक्रार अर्जानुसार पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यामध्ये ज्या बौद्ध समाजाच्या इसमाचा काहीच संबंध नसतांना तो घटनास्थळी हजर नसताना पंढरी म्हस्के यांनी जाणीवपुर्वक त्याचे नाव तक्रार अर्जात नमुद केले होते तेव्हा दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांनी पुर्ण गोपणीय चौकशीनंतर त्या बौद्ध इसमाला सोडून दिले आणि जे कोणी गुन्हेगार होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक सुद्धा केली.साप्ताहिक आपले ज्ञानपंख या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने पळासखेडा गावातील या दोन समाजाच्या घडलेल्या प्रकरणाबाबत विचारपूस केली असता गावातील काही लोकांनी असे सांगितले की, पंढरी म्हस्के यांच्या मुलांनीच त्या भिल्ल समाजाच्या मुलाला सर्वप्रथम काठीने मारहाण केली आणि तसे व्हिडिओ मध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहे ही वस्तुस्थिती असतात “उलटा चोर‌ कोतवाल को दाटे” असेच म्हणावे लागेल उलट त्याच पंढरी म्हस्के यांनी या आदीवासी लोकांना विरुद्ध तक्रार केली त्याच्या तक्रारीची दखल घेऊनच सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांनी कारवाई केली.मोटार सायकल वरुन पडलेल्या एका युवकांने केला मारहाण केल्याचा बनाव सदरील पळासखेडा येथे घडलेल्या पंढरी म्हस्के व भिल्ल समाजाच्या मारहाण प्रकरणात हॉस्पिटलमध्ये गळ्यात व हाताला पट्टी बांधून व डोक्यावर पट्टी लावून उपचार घेणारा हा इसम कोण हा तर त्या भांडणात नव्हताच पोलीसाला खब-याकडून जेव्हा माहिती मिळाली तेव्हा हा त्याच्या मोटारसायकल वरुन पडलेला आहे मात्र केवळ पोलिसांना जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.पोलीसांना काही सामाजिक संघटनानी पंढरी म्हस्के यांच्या तक्रारी संदर्भात फोन करुन केली जात आहे विचारणा पंढरी म्हस्के यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात लहुजी संघर्ष सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बहिलम व राज्य युवक अध्यक्ष स्वप्नील सपकाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना फोन करुन खरी वस्तुस्थिती जाणून घेतली परंतु ह्या प्रकरणाला जाणीवपुर्वक जातीय वळण देऊन राजकीय व सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम केल्या जात आहे.आमच्या प्रतिनिधीने सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांची भेट घेऊन खरी परिस्थिती जाणून घेतली असता ते म्हणाले की, पळासखेडा येथे दोन समाजात घडलेल्या मारहाण प्रकरणाबाबत पोलीसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन आरोपींना अटक केली आहे.परंतु आमच्या पोलीसांच्या कार्यपद्धती वर जर कोणी सामाजिक संघटना संशय घेऊन आमच्या चौकशीत ढवळाढवळ करत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करु अन्याय ग्रस्ताला न्याय व संरक्षण मिळायला पाहिजेत ते आम्ही करु तो त्यांचा हक्क आहे. परंतु पळासखेडा येथील प्रकरणाला जाणीवपुर्वक जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.फर्दापुर पोलीस या प्रकरणात कुठेच कमी पडले नाही.कायदा हातात घेणा-यांवर निश्चितच कायद्यानुसारच कारवाई केली जाईल. तसेच कोणीही या प्रकरणाला राजकीय व सामाजिक वळण देऊन गावातील सामाजिक वातावरण दुषित करु नये असे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *