विकासात राजकारण न करता विकासाचे राजकारण करा

Khozmaster
3 Min Read

आ सौ श्वेता ताई महाले पाटील

माळवंडी बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावात विकास कामांचा प्रचंड अनुशेष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी गावांच्या विकासाकडे लक्ष न देता स्व विकास आणि संस्था विकासाकडेच लक्ष दिल्याने ज्यांच्या भरवश्यावर मागील लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्यांनी गावांना विकासापासून कोसो दूर ठेवले. मागील दोन दोन अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार असल्याने निधीची वानवा होती . परंतू आता भाजपा शिवसेना युतीचे शिवशाहीचे सरकार सत्तारूढ झाल्याने निधीची कमतरता पडणार नाही . चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक गावातील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही . परंतु गावातील विकास कामे करतांना सरपंच आणि ग्रामसेवक यांचे सहकार्य लागणार आहे . कारण सरपंच आणि ग्रामसेवक हे गावच्या विकासाचे केंद्र बिंदू असल्याने विकासात कोणतेही राजकारण न करता विकासाचे राजकारण करूया असे आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत केले.

आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दि 13/9/2022 रोजी बुलडाणा तालुक्यातील

माळवंडी येथे सरपंच आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील गावातील विकास कामांचा गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्या उपस्थितीत आढावा घेतला . यामध्ये प्रत्येक गावातील कामनिहाय आढावा घेतला. यात मंजुर आणि प्रस्तावीत विकास कामामध्ये असलेल्या अडचणी सोडविण्या संदर्भात आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मार्गदर्शन केले.       त्या पुढे म्हणाल्या की, विकास कामांसाठी ग्राम पंचायत कडून लागणारी कागदपत्रे राजकारण आडवे आणून वेळेच्या आत दिल्या जात नाही. त्यामूळे कामांना विलंब होतो. त्यामूळे विनाकारण गावांचा विकास खोळंबतो. विकासाच्या राजकरणात जर खोळंब्याचे राजकारण होत असेल तर त्यास खोळंबा निर्माण करणारे जबाबदार धरले पाहिजे असे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.    यावेळी यावेळी तहसीलदार श्री खंडारे साहेब, गटविकास अधिकारी सौ सरिता पवार,ॲड सुनिल देशमुख तालुका अध्यक्ष भाजपा , संदीप उगले पंचायत समिती सदस्य, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, डॉ राजेश्वर उबरहडे तालुका सरचिटणीस भाजप, राजु नाटेकर अनुसूचित जाती जमाती जिल्हा सरचिणीस, डॉ, तेजराव नरवाडे सरपंच सावळी ,विष्णू उगले सरपंच रुईखेड ,गजानन देशमुख ,राजु भाऊ चांदा, रेहान संजरी,संजय एकनाथ सास्ते, गणेश निकम, प्रभाकर गायकवाड ,दिलीप शिरसाट, विष्णु वाघ, विशाल विसपुते,साहेबराव गवते,अरुण भोंडे शंकर तरमले, केशव तरमले, सागर गवते, किसन राऊत, पवन वाघ ,संदीप सोनुणे, प्रमोद वाघ, गणेश राजपूत,सुरेश चौधरी आस्तिक वारे सरपंच , सतीश पाटील, राजू अपार दत्ता शेवाळे सिधु लकडे प्रवीण राजपूत सोपान जगताप, देवेंद्र पायघान, सोपान जगताप,गणेश साखरे, दिनेश गवते, वसंतराव सोनुने, देवेंद्र पायघन, अमोल पाटिल, निलेश धंदर, राजू सोर,बबन सुसर, गजानन वातपाव, गजानन काळे, प्रदीप मांडोगडे, गोपाल सुरडकर,यांच्यासह सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थीत होते.

 

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *