_संपूर्ण जगामध्ये ज्या छत्रपती शिवरायांची ख्याती आहे त्या शिवरायांना घडवीणारी माता म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ..!१२ जानेवारी म्हणजेच या राजमातेची जयंती..! राजमाता जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. राजमाता जिजाऊंच्या महान कार्याची व त्यांच्या विचारांची संपूर्ण समाजाला नेहमीच आठवण रहावी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना व महिला आघाडी, नांदुरा शहर यांच्या वतीने सलग तीन दिवसीय* राजमाता जन्मोत्सव साजरा करण्यात आला._ _यामध्ये मंगळवार दि. १०/०१/२०२३ रोजी महिला व मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख, अनिलभाऊ जांगळे यांची लाभली . राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ – वृद्ध महिलांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना सरिताताई बावस्कार यांनी केली शिवकन्या हिंदवीने राजमाता यांच्या वेषभुषेत थोडक्यात जिजाऊचे मनोगत व्यक्त केले. शहरप्रमुख अनिलभाऊ जांगळे यांनी सर्व उपस्थितांना जिजाऊंच्या त्यागाबद्दल, स्वराज्यातील आपल्या अतुल्य योगदानाबद्दल माहिती सांगितली बाळासाहेबांची शिवसेना उपशहर प्रमुख प्रज्ञाताई तांदळे यांनी ‘जिजाऊ म्हणजेच शिवबांची आई’ या विषयावर माहिती देऊन जिजाऊंच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. सांस्कृतिक कार्यक्रमामधे धार्मिक गीतांवर नृत्य, पोवाडे, धार्मिक तथा देश भक्तीपर गीत गायनाचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. ११/०१/२०२२ रोजी बाळासाहेबांची शिवसेना कडुन राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि.१२/०१/२०२२ रोजी बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय नांदुरा शहर* येथे राजमाता जिजाऊ तसेच जगभरातील सर्व युवकांना प्रकाशमय मार्ग दाखविणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली दोन्ही राजमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांसोबतच बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कार्यक्रम साजरा केला._यावेळी माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, नांदुरा शहर उपप्रमुख संजय मेहसरे, भाजपाचे जितूभाऊ मोरे, युवा नेते शुभमभाऊ ढवळे, निलेशभाऊ पांडव, शहर संघटक जितुभाऊ जूनगडे,हरीश काटले, रवी म्हात्रे, शाम बावणे, संभाजी वसे विभाग प्रमुख, पवन जांगळे, महेश उंबरकर, विठ्ठल इंगळे, शुभम राठी युवा सेना सचिव, महादेव सपकाळ, बळीराम इंगळे, किसना इंगळे, दीपक तायडे, संतोष कंकाळ, प्रकाश बावस्कार, अनिल वसतकार, निलेश अमृतकर,भावना सोनटक्के, सचिव, सहसचिव विजया गोरे, मंगला सपकाळ, स्वाती पारधी, कांचन बावस्कार, प्रमिला राखोंडे, उषा बावस्कार, निशा मात्रे, प्रीती मेहसरे यांच्यासह यांच्यासह इतर शिवसैनिक, महिला व मुलींचा सहभाग होता.
Users Today : 33