शिवना प्रतिनिधि मुजीब शेख
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार जुगाऱ्यांन विरुध्द तर एका अवैध्य दारू विक्रेत्यांवर अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी चे नाव ( संजय सपकाळ, विजय बाबुराव मानकर, जगदीश काळे, दीपक दौड रा. शिवना ) तर (अमोल दादाराव काळे रा. शिवना) अवैध्य दारू विकणारा असे आरोपींचे नाव आहे .
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले,पोलीस नाईक कृष्णा उगले,रमेश काजले,हरिदास आहेर,सागर गायकवाड,ज्ञानेश्वर बेले आदींनी बुधवारी दुपारी टाकलेल्या धाडीत चार जुगाऱ्यान विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून १४४४० रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.तर सुमारे एका अवैध्यरित्या दारू विक्रेता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या ताब्यातून ६७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बीटजमादार अरुण गाडेकर,दिलीप तडवी,प्रभाकर जाधव पुढील तपास करीत आहे
Users Today : 32