विश्व हिंदू परिषद,हिंदूंच्या धार्मिक भावनांसोबत खेळ सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव बसस्थानकाजवळ असलेली जुनी मुतारी पाडून त्याठिकाणी सोयगाव नगरपंचायत अनधिकृत प्रशस्त मुतारी व शौचालयाचे बांधकाम करीत आहे. ही जागा त्रिविक्रम संस्थानकची असून त्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना ठेकेदाराने मनमानी करीत हिंदूंचे देवस्थान असलेले करोली माता मंदिर व श्री महादेव मंदिराच्या बाजूलाच बांधकाम सुरू केल्याने हिंदू मध्ये संतापाची लाठ उसळली आहे.दरम्यान सदरील बांधकाम तात्काळ थांबवून इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यासह तहसीलदार सोयगाव,मुख्याधिकारी नगरपंचायत, व गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सोयगाव येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोयगाव एस टी बसस्थानकावर श्री त्रिविक्रम संस्थान शेंदुर्णी यांच्या मालकीची जमीन असून येथे जय करोली माता व महादेव मंदिर आहे.येथे नगर पंचायत सोयगाव सौचालयाचे बांधकाम करीत आहे. यास हिंदू धर्मीय जनतेचा विरोध असतांना ठेकेदार मात्र मनमानी करीत काम सुरूच ठेवत असल्याने हिंदू बांधवांमध्ये धर्माच्या भावना दुखावत आहे.हा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊ नये तसेच मंदिरा शेजारी सुरू असलेल्या शौचालयाच्या बांधकाम तात्काळ बंद करण्यात येऊन स्थलांतरित करण्यात यावे. नसता येत्या प्रजासत्ताकदिनी हिंदूंचा नगर पंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा ईशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यासह तहसीलदार सोयगाव,मुख्याधिकारी नगरपंचायत, व गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे प्रखड प्रमुख नसुनील गावंडे व बजरंगी दीपक सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.कोड : याप्रकरणी संबधीत निवेदन अद्याप माझेपर्यंत पोहोचलेले नाही कदाचित उशिरा आलेले असेल ते बघून कारवाई करण्यात येईल –
रमेश जसवंत,
मुख्यअधिकारी नगर पंचायत सोयगाव
: सोयगाव – एस टी बसस्थानका शेजारी करोली माता मंदिराला लागून नगर पंचायतीतर्फे सौचालयाचे सुरू असलेले बांधकाम
Users Today : 29