पालक, विद्यार्थ्यांकडून दहावी- बारावीसाठी नवनीत २१ अपेक्षितला विद्यार्थीची मागणी

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद (प्रतींनिधी गोकुळसिंग राजपूत)
औरंगाबाद ,माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षक मंडळाने अलीकडेच दहावी- बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले. बारावीची परीक्षा मंगळवार दि. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या काळात होईल. तर दहावीची परीक्षा गुरुवार २ मार्च ते २५ मार्च २०२३ या काळात पार पडणार आहे.त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले असून अधिक अभ्यास होण्याच्या दृष्टीकोनातून पुस्तकांच्या दुकानात नवनीत २१ अपेक्षित व सरावप्रश्न  संच या मार्गदर्शक पुस्तकांची मागणी वाढली आहे. सध्या विद्यार्थी टीव्ही व इतर वायफळ गोष्टींवर वेळ न घालवता दररोज नियमितपणे अध्ययन करीत आहेत. परीक्षेला थोडा अवधी शिल्लक उरल्याने बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थ्यापुढे आहे. त्यामुळेच पुरक साहित्य म्हणून नवनीत २१ अपेक्षित व सरावप्रश्न  संच या पुस्तकांना विद्यार्थी व पालक प्राधान्य देत आहेत. त्यामध्ये सर्व विषयांचे अचूक उत्तरांसह प्रश्न प्रकारनिहाय प्रश्नसंच देण्यात आले आहेत. नमुना प्रश्नपत्रिका सोडवून दाखविलेली असल्याने गुणवाढीसाठी ती उपयुक्त ठरते. असा अभिप्राय अनेक शिक्षक देखील देतात. विशेष म्हणजे नवनीतने सर्व प्रश्नांची उत्तरे क्यु आर कोडवर दिलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हुशार विद्यार्थ्यासह सर्वसामान्य विद्यार्थ्यांची पसंती नवनीत २१ अपेक्षित व सराव प्रश्नसंच यांनाच मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाकडे सरावलेल्या विद्यार्थ्यांकडून आधुनिक साधंनांचा वापर अभ्यासला पुरक ठरतो. हे कोरोनाच्या काळातही सिद्ध झाले. त्याचा लाभ नवनीत २१ अपेक्षित व सराव प्रश्नपत्रिका यातुन मिळतो. योग्य तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध नसतील तरीही या मार्गदर्शक पुस्तकांमुळे परिपुर्ण तयारी होते, अशी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धारणा आहे.
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *