बुलडाणा :
श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणार्या तिघांना दिल्लीत आयबी ने अटक केली. अटक करण्यात आलेले तिघेही बुलडाणा शहरातील रहिवासी असल्याचे समोर आल्यानंतर तिघा आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून श्रीमंत होण्यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांना अपहरण करण्याचा प्लॅन तिघांनी रचल्याचे समोर आले. बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी माहिती दिली आहे.