शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतीनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद परिसरात मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय असल्याचे चर्चांना उधान आले आणि याच संशयावरून एका किन्नरला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना 14 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद ला घडली. सविस्तर अशी की मलकापूर येथील रहिवाशी सायरा मोगरा जान 20 वर्ष ह्या भिक्षा मागण्याचे काम करतात गावोगावी जाऊन दुकानावर व बाजारात दक्षिणा मागतात दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायरा मोगरा जान व रेणुका जान हे दक्षिणा मागण्यासाठी जळगाव जामोद ला आल्या त्यानंतर जामोदचा बाजार असल्याने तेथून भिक्षा घेऊन एका अनोळखी ऑटो मध्ये बसून जळगाव जामोद येथील जुने बस स्टँडवर दुपारी 4 च्या सुमारास पोहोचले. त्यानंतर ऑटो चालकाने काही लोकांना फोन करून माझ्या ऑटो मध्ये मुले चोरून नेणारी बाई आहे असे सांगितले त्यानंतर तिथे 7 ते 8 अनोळखी माणसे आली व त्यापैकी 4 ते 5 जणांनी फिर्यादीला ऑटोतून ओढून चापटा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणले यावेळी ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी मलकापूर येथे चौकशी करून सायरा मोगरा जान ही मोगरा जान यांच्या आश्रमात राहत असून सायरा ही मुले पळवून नेणारी नसून दक्षिणा मागणारी आहे याची खात्री केली दरम्यान सायराला मारहाण करणारे गाजी खान उर्फ बाबर आमिर खान, नवसिंग दुर्गा सिंग सोळंके, प्रवीण उर्फ भुरा भीमराव तायडे, दीपक सुखदेव उंबरकर, अभिजीत विलास तायडे यांच्यावर भांदवी नुसार 323 143 147 149 नुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय घोडेस्वार करीत आहेत तसेच पोलीस प्रशासन दक्ष असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे ठाणेदरानी सांगितले.
Users Today : 18