चामळीची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Khozmaster
3 Min Read

आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत सावरगाव येथील प्रकार

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी

 

योगेश नागोलकार

 

राहेर : पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वन्य प्राण्यांची शिकार थांबते थांबेना असे चित्र आहे. वन विभागाच्या सावरगाव बीट क्रमांक ३ मध्ये २३/०४/२०२२ वेळ १४: ३८ वाजता संबंधित काही कर्मचाऱ्यांनी बिबट्याची चामळीची विल्हेवाट लावल्या बाबतचा जीपीआरएसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, सदर प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पत्रकारांनी आलेगाव वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पंचनामा करण्याचे आश्वासन दिले, परंतु बिबट्याची चामळीची विल्हेवाट लावल्याच्या ठिकाणाहून इतर ठिकाणी पुन्हा चामळीची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती मिळताच एका वृत्त पत्राचा पत्रकार गोपाल राठोड व सावरगावचे सरपंच गजानन बलक व इतर गावातील मंडळी त्या ठिकाणी गेले असता, वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणाहून चामळीची पुन्हा विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न असल्याने पत्रकारांनी व्हिडिओ काढला, व्हिडिओचा पुरावा नष्ट करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी पत्रकारांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न करून चक्क आमच्या जंगलात का आला व्हिडिओचा पुरावा डिलीट कर अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पत्रकारांना अडवला पत्रकारांनी वन कर्मचाऱ्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला,त्यावेळी चक्क वन कर्मचाऱ्यांनी पत्रकार जंगलात का आला याबाबतचा व्हिडिओ काढून धमकी दिली, चामळीची पुन्हा विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन विभागाचे अधिकारी जागी झाले आणि गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती, सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्राकडून होत आहेत.

 

सावरगाव परिसरात बिबट्याची चामळीची विल्हेवाट लावण्यात आल्या बाबतची माहिती प्राप्त झाली असून, त्याबाबतचा पंचनामा व चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

 ए. आर. अर्जुना- वन संरक्षण अधिकारी अकोला

गावचे सरपंच पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जे कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव

 

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून पत्रकारांना दमदाटी

बिबट्याची चामळीची विल्हेवाट केल्याचा प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीमुळे आधी पंचनामा करण्यास टाळाटाळ नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण व वन रक्षक यांच्याकडून चक्क पत्रकारांना दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

चामळीची विल्हेवाटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बिबट्याची चामळीची विल्हेवाट लावण्यात आल्याचा जीपीआरएसचा फोटो तसेच पुन्हा चामळीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने सदर प्रकरण उघडकीस आला आहे

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *