कर्मयोगी तात्यासाहेबांच्या समाज सेवेचा वारसा अॅड.वृषालीताई बोंद्रे पुढे नेत आहेत – डॉ. विकास बाहेकर

Khozmaster
7 Min Read

चिखली:

‘रूग्णसेवा हिच ईष्वर सेवा’ मानुन कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या शिवभावे जिवसेवेचा वसा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या पाउलावर पाउल टाकीत हिकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापीका अॅड.सौ. वृषालाताई बोंद्रे हया सातत्याने पुढे नेत आहेत. अनुराधा परीवाराच्या माध्यमातुन तपासणी बरोबरच उपचारासाठी सातत्यपुर्ण आरोग्य विषयक विविध षिबीरांचे आयोजन गत 27 वर्षापासुन अविरतपणे सुरू असुन आजवर संपन्न झालेल्या शेकडो षिबीराचा लाभ परीसरातील लाखो रूग्णांनी घेतला यामुळे गेल्या काही वर्षात रूग्णांचे प्रमाण कमी होत असल्याची अनुभूती येत आहे. अनुराधा परिवाराच्या या रूग्णसेवेच्या माध्यमातुन समाजाची रोग मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन बुलडाणा येथील नामवंत नेत्र चिकीत्सक डॉ. विकास बाहेकर यांनी केले. अॅड सौ. वृषालीताई बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे निमित्त आज दिनांक 15 सप्टेंबरे 2022 रोजी संपन्न झालेल्या भव्य निषुल्क महाआरोग्य शिबीर प्रसंगी केले. यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिीती होती.

स्थानिक परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान येथे अॅड वृषालीताीई बोंद्रे यांच्या वाढदिवसा निमित्त अनुराधा परीवार व गोदावरी फाउडेषन यांच्या संयुक्त विद्यमाने निःषुल्क भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात नेत्ररोग, हद्यरोग, स्त्रिरोग, हाडाचे,पोटाचे,किडणीचे विकार, कान-नाक-घसा, विषयी शस्त्रक्रीयेच्या विविध तपसण्या करण्यात येवून आवष्यक त्या औषधींचा रूग्णांना मोफत वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने स्त्रिरोग विभागात महिलांना सतत भेडसावणारी मासिक पाळी, वंधत्व निवारण उपचार, कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया, गर्भाषयाचे विविध आजार, त्याचप्रमाणे नेत्र विभागा अंतर्गत मोतीबिंदु व डोळयांचे विकार, कानाचा पडदा,नाकाचे हाड, साधेदुखी, कंबरदुखी, सांधेवात, हाडांची झिझ व ठिसुळता, मासपेसी वेधना, आदीबरोबर एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, लिव्हर पित्ताषय व पोटाचे आजार, तसेच व्यसनमुक्ती इत्यादी तपासण्या व योग्य वैद्यकीय मार्गदर्षन यावेळी करण्यात आले.

अॅड.वृषालीताई बोंद्रे यांच्या वाढदिवसा निमित्त अनुराधा परीवार व गोदावरी फाउंडेषनच्या वतीने आयोजित या महाआरोग्य षिबीराचे उद्घाटन प्रसंगी डॉ. विकास बाहेकर बोलतांना पुढे म्हणाले की, रूग्णसेवा हिच ईष्वर सेवा आहे. आणी सेवाभाव वृध्दीगत होण्यासाठी बालमनावर संस्कार महत्वाचे असतात, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यावर बालावस्थेपासुनच हे संस्कार केल्यामुळे गत 30 वर्षाहून अधिक कालापासुन विविध आरोग्य षिबीरांच्या माध्यमातुन राहुलभाउ रूग्ण सेवेचा वारसा पुढे नेत आहेत. ज्या ज्या वेळी मी अषा शिबीरांना उपस्थिती दर्षवीली त्यावेळी आजवर घेण्यात आलेल्या शेकडो रोगनिदान शिबीरांच्यामुळे सदयस्थितीतील शिबीर प्रसंगी रूग्णांची संख्या दिवसेगणीक कमी होत चालल्याचे निर्दषनास येत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केेले. या शिबीरांमुळे उपचार घेण्याची परिस्थीती नसलेल्या असंख्य गोरगरीबांना मोफत उपचार मिळतात. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, राहुलभाउ बोंद्रे आणि त्यांच्या पाठोपाठ आता अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे हा वारसा पुढे नेत आहेत, त्यांच्या हातुन ही सेवा निरंतर घडो अषा सदिच्छाही देण्यास यावेळी डॉ. विकास बाहेकर विसरले नाही.

या षिबीर प्रसंगी जळगांव येथील गोदावरी फाउंडेषनचे डॉ. वरूनदेव, डॉ. मेैत्रेयी बिरादार, डॉ. पियुष पवार, डॉ. असीम मुलानी, डॉ. समाधान बाहेकर, डॉ. आकाष मालवी, अषुतोष गिरभिडे, अकोला येथील डॉ. प्रणाली उके, डॉ. इमराण खान, डॉ. प्रदीप गोदारा, डॉ. पुरूषोत्तम ससाने, डॉ. आदित्य पाटील, यांच्यासह डॉ. भारत पानगोळे, डॉ. काळुसे, डॉ. वसु, डॉ. सावजी, डॉ. गोसावी, डॉ.रविंद्र कमळस्कर, डॉ. बंगाळे, डॉ. प्रविण राजपुत, डॉ.सेैयद कलीमोद्यीन, डॉ. संदेष राठोड, डॉ. क्षिरसागर, डॉ.डी.के. पालवे, डॉ. मिलींद खिल्लारे, डॉ.सुभाष जोषी, डॉ. अविनाष काळे, डॉ. नेहा जोषी, डॉ. संजय पाटील, डॉ. एस.पी. काळे, डॉ. व्हि.पी. सिरसाट, डॉ. एन.एस.पाटील, डॉ. जगदीष एस. बाहेकर, डॉ. व्ही.जी. राजपुत, डॉ. आर.एच. लोखंडवाला, डॉ. ए.जी.पवार, डॉ.एस.एस. गिरटे, डॉ.ए0एस. एकडे, डॉ. पांडुरंग चौथनकर, डॉ. प्रविण अंभोरे, डॉ. अक्षय पाटील, डॉ. किरण मोदे, डॉ. दिप्ती वाणी, डॉ. दिनेष वाणी, डॉ. अर्मपाली वानखेडे, डॉ. ईष्वर सरनाईक यांच्यासह वैद्यकीय तज्ञ व चमु यांची उपस्थिती होती. या अनुराधा परीवाराच्या निःषुल्क भव्य महाआरोग्य षिबीर प्रसंगी गोदावरी फाउंडेषन जळगांव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा, तालुका आरोग्य अधिकारी चिखली, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय चिखली, श्री अनिलभाउ नावंदर खामगांव, राजेंद्र नहार खामगांव, विनोद नागवाणी चिखली, इंडियन मेडीकल असोसिएषन बुलडाणा, इंडियन मेडीकल असोसिएषन चिखली, चुनावाले आयुर्वेदीक महाविद्यालय चिखली येथील तज्ञ डॉक्टरस् व तंज्ञ चमुंचे सहकार्य लाभले.

 

या शिबीराला विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, डॉ. सत्येंद्र भुसारी, दिपक देषमाने, डॉ. इसरार, अतहरोद्यीन काझी, राम डहाके, अषोकराव पडघान, ज्ञानेष्वर सुरूषे, आत्माराम देषमाने, वर्धमानसेठ डहाळे, सिध्देष्वर वानेरे, सौ. करूणाताई बोंद्रे, सौ. अनिताताई घुगे, सौ. संगिताताई गाडेकर, सौ. विद्याताई देषमाने, श्रीमती प्रमिलाताई जाधव, अमिनखॉ उस्मानखॉ, नगरसेकव आसिफ भाई, हाजी रउफ भाई, दिपक खरात, गोपाल देव्हडे, गोकुळ षिंगणे, राजु रज्जाक, दिपक थोरात, प्रदिप हाके, दिपक हाके, हेमंत षिसोदिया, गजानन परीहार, बाळु साळोख, ईष्वरराव इंगळे, खलील बागवान, अकिल भाई, जाकीर भाई, नासेर सौदागर,

 

तात्यासाहेबांचे संस्काराच जनसेवेचे उर्जा स्त्रोत – अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे

शैक्षणीक दालनांच्या उभारणीच्या माध्यमातुन कर्मयोगी तात्यासाहेब बांेद्रे यांनी तरूण व युवा पिढीला सुषिक्षीत करून स्वावलंबी करण्याकरीता अनेक संधी उपलब्ध करून दिल्यात. त्याच प्रमाणे तात्यासाहेबांचे सुसंस्कृत संस्कार आणि उच्च विचार सारणी अंगीकृत केल्यामुळे आम्हांला जनसेवा करण्याची प्रेरणा व उर्जा प्राप्ती होत आहे. तात्यासाहेबांच्या रूग्णसेवेचा वसा अनुराधा परिवाराच्या माध्यमातुन माजी आमदार राहुल बोंद्रे अविरतपणे पुढे नेत असुन त्यांच्या या जनसेवेच्या कार्याला आपली ही जोड असावी, या उदांत्य हेतुने आपण सुध्दा जनसेवेच्या महायज्ञात खारीचा वाटा उचलत असल्याचे मत व्यक्त करीत अॅड.वृषालीताई पुढे म्हणाल्या की, तात्यासाहेबांच्या संस्कारातुनच जनसेवेची खरी उर्जा प्राप्ती होत आहे. यामुळे धार्मीक, सामाजीक, राजकीय, सांस्कृतीक कार्यात अनुराधा परीवाराचा सदैव्य पुढाकार असतो. चुल आणी मुलांमध्ये गुंतलेल्या असंख्य महिलांचे आपल्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने त्या विविध आजारांना बळी पडतात. या आरोग्य षिबीरांच्या माध्यमातुन स्त्रियांचे आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा आपला प्रामाणीक प्रयत्न असुन आजारातुन मुक्त झालेल्या महिलांच्या चेह-यावरील आनंद पाहुन आपल्याला समाधान होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या शिबीराच्या यषस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, प्राचार्य डॉ. काळे, डॉ. पागोरे, प्रा. उन्मेष जोषी, प्रा. कुलकर्णी, अनुराधा फार्मसी कॉलेजचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वंृद यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा.उन्मेष जोषी यांनी केले. यावेळी षिबीरात आलेल्या रूग्णांची चहा,नास्ता व जेवनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.

 

3740 रूग्णांच्या केल्या विविध तपासण्या

 2228 नेत्र रूग्णांच्या तपासण्या

 700 हद्यरोग रूग्णांच्या तपासणी

 600 स्त्रि रूग्णांच्या विविध तपासण्या

 600 रूग्ण ठरले शस्त्रक्रीयेस पात्र

 दि. 17 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार चष्म्यांचे वाटप

 दि. 20 सप्टेंबर 2022 शस्त्रक्रीयेस पात्र ठरलेल्या रूग्णांची उपचारासाठी रवानगी

 रूग्णांना आवष्यक त्या औषधींचे शिबीर स्थळीच केले मोफत वाटप

 

0 9 4 6 2 9
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *