राहेर:- पातूर तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत पांढुणाॅ येथील सरपंच पती सुभाष शेळके यांनी बाळासाहेब थोरात वनरक्ष यास जिवे मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली . वनक्षक बाळासाहेब थोरात हे आपल्या साथीदारांसह सोनुना बीट क्रमांक 2 मध्ये गस्त घालत असताना त्यांना जंगलामध्ये गावरान दारूचे डब्बे व जंगलामध्ये सडके मोह आढळून आले असतात. दारुवाल्यांना अशे प्रकारचे दारू जंगलामध्ये काढू नका या सडके मोह खल्यांने प्राण्याचा मृत्यू होईल असे सांगितले असता . गावातील सरपंच पती सुभाष शेलके यांनी वनरक्षक यास मोबाइल वरून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. तोच वन विभगाचे कर्मचारी व अधिकारी यांनी पोलिस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास करीत आहेत वन विभागाने सुद्धा वन कायद्या अंतर्गत विविध कल्मांनवे गुन्हा दाखल केला असुन पोलिस विभाग व वन विभाग पुढील तपास करीत आहेत.
सदर गुन्ह्या मध्ये जंगलामध्ये जाऊन पोलिस विभागाचे अधिकारी व वन विभागाचे अधिकारी आम्ही पाहणी केली असतां आम्हाला जंगलामध्ये दारूचे डब्बे व मोह अढळून आले आहेत. त्या आधारे आम्ही वन कायद्या अंतर्गत विवीध कलमानवे गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास चालू आहे.
दादाराव इंगळे. वनपाल पिंपळडोळी