पिंपळखुटा येथे रशिया येथील झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण निमित्त आनंदोत्सव साजरा

Khozmaster
1 Min Read

 

योगेश नागोलकार

राहेर:-दि‌.14 सप्टेंबर रोजी झालेल्या रशियामधील मॉस्को या शहरांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या अनावरण निमित्त पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.तसेच अनुलोमचे आदित्य तायडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखून परिश्रम घेतले. व संचालन केले‌. ह्यावेळी बाल गायक विशाल राऊत या छोट्या कार्यकर्त्यांनी गीत गायन केले.व अथर्व गोपाल राऊत आणि विराज रामसिंग शेलार या बाल व्याख्यात्यांनी व्याख्यान केले. व श्री पंडित वानखडे यांनी आपले मत मांडले तसेच रवी शेलार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रम वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच महिला व बालक सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *