सोयगाव प्रतिनिधी, गोकुळसिंग राजपूत ;जामनेर – तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील सविस्तर वृत्त असे की घाणेगाव तांडा येथील आश्रम शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक प्रवीण साईदास पवार वय 37 राहणार महूखेडा हे आपल्या मित्रासह शाळेवर जात असताना देऊळगाव गुजरी येथील बस स्टैंडवर दिनांक 14 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास काहीजणांनी हेतू पुरस्कर शिक्षकांची गाडी थांबवून तुम्ही आमची बदनामी केली अशी खोटी फोन रेकॉर्डिंग सादर करून शिक्षक प्रवीण पवार सर यांना कमरेच्या पट्ट्याने व लाताबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणावरून औरंगाबाद जिल्ह्यासह इतरत्र सर्व ठिकाणी शिक्षक बांधवांमध्ये तणावाचे व निषेधार्थ वातावरण तयार झालेले असून आशा अरेरावी पद्धतीने शिक्षकावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर प्रवीण पवार सर यांच्या फिर्यादीवरून पोलीस प्रशासनाने आरोपी राजेंद्र गुलाबसिंग जाधव औरंगाबाद, जयेंद्र विजयसिंह राठोड घाणेगाव, कृष्णा रायसिंग पवार व मारहाण करताना त्यांच्यासोबत असलेले इतर चौघेजण राहणार देऊळगाव गुजरी अशा एकूण सात जणांवर भादवि 1860 नुसार कलम 324, 323, 341, 343, 147, 148 व 149 प्रमाणे पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले फत्तेपुर येथील दरूक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी फत्तेपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी व दिनेश मारवडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस करण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व शिक्षक संघटना व आश्रम शाळेचे संचालक मंडळ यांनी शाळेला भेट देऊन एका शिक्षकाला केलेल्या मारहाणी बद्दल निषेध व्यक्त केला आहे, तसेच अशा दादागिरी व भाईगिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अशा आरोपींना चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशी मागणी सर्वत्र शिक्षक बांधव, कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.