अविरत ज्ञानदानाची सेवा देण्याचे कार्य शिक्षक करतात

Khozmaster
3 Min Read

आ .सौ. श्वेता ताई महाले पाटील

चिखली : मानवाची ज्याच्या मुळे प्रगती झाली ते म्हणजे शिक्षण. आदिमानवाच्या वेळी किंवा त्यानंतरही गुरूकुल किंवा शाळा नव्हत्या त्यावेळी सुद्धा गरजेतून किंवा अनुभवातून अनेक गोष्टी शिकला.मानवाने शिकत शिकतच स्वतः ची प्रगती करून अख्ख जग हाताच्या बोटावर आणून ठेवले आहे. हे सर्व गुरू, शिक्षकांमुळे शक्य झाले . गुरुजी यांनी दिलेल्या ज्ञानदानाच्या महान कार्यामुळे अनेक पिढ्या घडल्या. आहे त्या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. काहींनी पगार न घेता काहींनी अत्यल्प मान धनावर काम करून ज्ञान दानाचे कार्य केले. आपण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर पासुन ते 2 ऑक्टोंबर या गांधी जयंतीच्या दिवसापर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत. या पंधरवाड्यात जनसेवेची विवीध कामे शासन प्रशासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. परंतु शिक्षक हे अविरत ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याचे गौरव पुर्ण उद्गार आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चिखली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सत्कार प्रसंगी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त चिखली शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या वतीने चिखली शहरात व तालुक्यातील राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्या शिक्षकांच्या आयोजित शिक्षक सत्कार समारंभ मध्ये त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर पासुन ते 2 ऑक्टोंबर या गांधी जयंतीच्या दिवसापर्यंत सेवा पंधरवाड्यानिमित्त आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सदानंद देशमुख , उ. भा. बिडवे, गुलाबराव खेडेकर , दे.स. इटोकर , कमलकिशोर लांडगे

अनंतराव चेके, पिसे सर , शे. आहद शे. उस्मान, शे. आरिफउल्ला खा शफीउल्ला , आर.डी.शिंदे साहेब, सौ. सुलताना बी कलीम खा , पी. एस. वायाळ , चौथे सर

फिरोज सर, रमेश रतन पाटील , आर. आर. पाटील सर , नंदकिशोर गायकवाड सर , विठठ्ल दगडुजी चिंचोले , दिपक बाबुराव पाटील , नारायण विश्वनाथ हाके , प्रविण रमेश सोनाळकर , कु. संजीवनी शितोळे

संजय प्रताप परिहार ,जैनुल अबेदीन म. रफीक आऐशा सिध्दीक म. इलियास , सौ. निशा नंदकिशोर जाधव ,मनोज प्रकाश इरले , वासुदेव जनार्दन महाले समाधान गोविंदराव शेळके , प्रमोद ठोंबर (उपप्राचार्य) इत्यादी शिक्षक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

वेळी ॲड. विजयजी कोठारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रामकृष्णदादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, प्रेमराजजी भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, सुरेंद्रजी पांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, अजय कोठारी, सौ. सुनिताताई भालेराव शहराध्यक्ष महिला मोर्चा, सौ. अर्चनाताई खबुतरे नगरसेविका, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, डॉ दामोधर भवर सुनीताबाई भालेराव अर्चनाताई भालेराव आनंदराव हिवाळे अंकुशराव पाटील वीरेंद्र वानखेडे गोपाल आप्पा शेट्टी किशोरजी दहिवाळ सचिन गुरदासनी राहुल ठेंग पवन सर शकुंतला बाई बाई कर वैशालीताई देशमुख चित्राताई पाटील हरिभाऊ जाधव सुनील देशमुख चेतन देशमुख यांच्या सर्व संचालक मंडळ उपस्थित होते नगरसेवक विजय नकवाल, संजय अतार, सरचिटणीस युवराज भुसारी, किशोर जामदार, महेश लोणकर, संदीप लोखंडे, सचिन कुळवंत, सचिन लोखंडे, आयुष कोठारी, सिद्धेश्वर परिहर, सिद्धेश्वर ठेंग, अनिकेत सावजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *