१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपाचा सेवा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करा ना.रावसाहेब दानवे

Khozmaster
2 Min Read

        सतीश मवाळ मेहकर दि १७/९/२२ /  रोजी भारतीय जनता पार्टी मेहकर तालुक्याच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. ना .रावसाहेब दानवे पाटील यांचे शासकीय विश्रामगृह मेहकर येथे ४ वाजता आगमन झाले असता त्यांचे स्वागत करण्यात आले .व ना.दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सेवा करून साजरा करणार असून त्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपाचा सेवा पंधरवडा हा उपक्रम असेल, या कालावधीत स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम होणार असून त्यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार असे सर्वजण सक्रीय सहभागी होणार आहेत, ना.दानवे यांनी म्हणाले आहे.याप्रसंगी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रल्हाद अण्णा लष्कर, मेहकर तालुका अध्यक्ष ऍड शिव पाटील ठाकरे, अल्पसंख्याक आघाडी प्रदेश सचिव मंदाकिनीताई कंकाळ, भाजपा जिल्हा सचिव प्रदीप इलग, अध्यात्मिक आघाडी जि अध्यक्ष सीताराम महाराज ठोकळ,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ पार्वतीताई कान्हे,जिल्हा उपाध्यक्ष अजिम मामू कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष आध्या आघाडी पंढरीनाथ देवकर, किसान आघाडी जिल्हा सचिव राजेश निकम,अ जा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांतजी मिसाळ, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष रईस भाई , रोहित सोळके, भाजपाचे चंदन अडेलकर , भाजपचेश्री यौगेश सौभागे, तालुका उपाध्यक्ष ऍड रजनीकांत कांबळे, ज्ञानेश्वर पवार , शहर सरचिटणीस अजय शिरे, सतीश बोरकर, ओबीसी मोर्चा चे विलासराव म्हस्के सरपंच केशव देवडे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

खा.प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना..रावसाहेब दानवे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.व प्रंसगी मान्यवर यांचा सत्कार केला.यावेळी आमदार संतोष पाटील दानवे,सौ.निर्मलाताई रावसाहेब दानवे,सौ.राजश्री प्रतापराव जाधव, सौ.मयुरी ऋषी जाधव भाजप शिवसेना युवतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *