चान्नी पोलिसांच्या सतर्कतेने पती चौकशीसाठी ताब्यात
राहेर : शहरातील एका खाजगी डॉक्टर पती पत्नीचा मृतदेह वाहनात संशयस्पद फिरवताना चान्नी पोलिसांनी शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजीच्या रात्री ७:३० वाजताच्या सुमारास पतीला मृतदेह व वाहनासह ताब्यात घेतले, चोंढी परिसरात एका वाहनात संशयास्पद मृतदेह नेल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, अविनाश मोहिते, हर्षल श्रीवास, सुनील भाकरे, दत्ता हिंगणे, यांनी तत्काळ सतर्कता दाखवून वाहनाचा पाठलाग करून वाहन अडविले, डॉक्टर पतीला पोलिसांनी विचारपूस केली असता, डॉक्टर पतीने उडवा उडवाउडवीचे उत्तरे दिली, पत्नीची प्रकृती खराब आहे, हदयविकारामुळे मृत्यू झाला, आत्महत्या केली, असे विविध कारण पुढे करून उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला, पोलिसांनी पतीला वाहनासह ताब्यात घेऊन मृतदेह चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, विवाहित महिलेला डॉक्टरांनी मृतक घोषित केले,पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले असून, पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ,पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे. प्रतिक्रिया चोंढी परिसरात वाहनात मृतदेह संशयस्पद असल्याची गुप्त माहिती मिळाली, सदर माहितीवरून तत्काळ वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवून, पतीला विचारपूस केली असता, उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्याने चौकशीसाठी पतीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
गणेश महाजन उपनिरीक्षक पो. स्टे चान्नी