देवेंद्र सिरसाट:नागपूर-हंसा सिटी बस सर्विसेस येथे आपली शहर बस सेवा अंतर्गत चालक पदावर कार्यरत असलेले विजय जानराव ढोले यांचा कर्त्वव्यार असतांन अपघातात मृत्यू झाला ते 32 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी,अडीच वर्षाची मुलगी व म्हातारे आई, वडील आहेत. विजय ढोले नागपूर शहरांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आपली बस मध्ये चालक पदावर कार्यरत होते ते दिनांक 16/ 9 / 2022 सकाळी आपल्या कर्तव्यावर हजर झाले त्यांनी आपली बस डेपो मधून काढली आणि ते प्रवासी घेत आर्डनस फॅक्ट्री अंबाझरी वसाहतीमध्ये पोचले तेथून ते नागपूर कडे जात असताना डिफेन्स गेट पार करत असताना अमरावती मार्गावर नागपूर कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या बसला ड्रायव्हर च्या बाजूला जोरदार धडक दिली या अपघातात बस चे ड्रायव्हर साईट चे गेट उघडले गेले आणि विजय ढोले हे डिव्हाडर वर जोरात फेकले गेले त्यांना जबर दुखापत झाली होती उपस्थितांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता दिनांक 18 / 9 रोजी त्यांचा मृत्यू झाला.या बसचे नियंत्रण हंसा सिटी बस सर्विस करत असल्याचे सांगितले गेले, विजय ढोले यांच्या परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आई वडील मोल मजूरी करतात विजय चे गाव नवेगाव तारसा रोड जिल्हा नागपूर असून ते नागपूर च्या नागसेनवन येथे भाड्याची खोली करुन पत्नी व लहानग्या मुलीसह राहत होते, संबंधित विभागाने त्यांच्या परिवाराला अर्थीक मदत करून त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी अशी विनंती परिवार व बस चालक,वाहकांनी केली आहे.
Users Today : 19